युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकारिणीत यावल तालुक्यातील पदाधिकार्‍यांना स्थान

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | युवक राष्ट्रवादीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी येथील विनोद पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांच्या नेतृत्वाखाली यावल तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार्‍या कार्यकर्त्यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस व राष्ट्रवादी युवकच्या विविध पदांवर निवड करण्यात आली आहे . जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष ( अजीतदादा पवार ) यांच्या प्रमुख उपस्थितीत भुसावळ येथील कार्यालयात बैठक संपन्न होवुन यावल तालुक्याची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

या प्रसंगी राष्ट्रवारी कॉंग्रेस युवक जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडिया, उपजिल्हाध्यक्ष गुणवंत निळ हे बैठकीस प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी निवड करण्यात आलेल्या पदाधिकारी यांची जाहीर कार्यकारणी खालील प्रमाणे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेय तालुकाध्यक्षपदी आकाश चोपडे यांची नियुक्ती करण्यात आली.

यासोबत, युवकच्या जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र सोनवणे, युवक जिल्हा उपाध्यक्ष चुंचाळे तालुका यावलचे विनोद पाटील, युवक जिल्हा सरचिटणीस जुगल श्रीनिवास पाटील यांची तर राष्ट्रवादी पक्षाच्या यावल शहराध्यक्ष राजू करांडे यांची व यावल तालुका कार्याध्यक्ष जितेंद्र सोनवणे शहर उपाध्यक्ष चेतन सपकाळे यांची निवड जाहीर करण्यात आली असुन , निवड झालेल्या सर्व पक्षात प्रवेश करणार्‍या पदाधिकार्‍यांचे स्वागत करण्यात येत आहे.

Protected Content