यावल- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यात आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत महिलांचे वर्चस्व स्पष्ट होत आहे. नुकत्याच तहसील कार्यालयात पार पडलेल्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीत ३२ ग्रामपंचायतींमध्ये कारभाराची सूत्रे महिलांच्या हाती जाणार असल्याचे निश्चित झाले आहे.
या सोडतीत एकूण ६३ ग्रामपंचायतींसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले, ज्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला आणि सर्वसाधारण गट अशा विविध प्रवर्गांमध्ये पदे राखीव ठेवण्यात आली आहेत. या आरक्षण प्रक्रियेला फैजपूर विभागाचे प्रांताधिकारी बबनराव काकडे, तहसीलदार मोहनमाला नाझिरकर आणि निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
या ३२ महिला आरक्षित पदांमुळे गावातील स्त्रियांना नेतृत्वाची संधी मिळणार असून ग्रामविकास, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रात महिलांची प्रभावी भूमिका पुढे येणार आहे.
यावेळी ६३ ग्रामपंचायतीचे काढण्यात आलेले आरक्षण हे पुढील प्रमाणे असणार – १ )भालशिव अनु.जमाती , २ ) बोरावल बु॥ अनु.जमाती स्त्री, ३ ) मोहराळे अनु .जमाती स्री, ४ )वढोदा प्र .यावल अनु . जमाती स्त्री , ५ )बोरखेडा बु॥ अनु .जमाती स्त्री ,६ ) सावखेडा सिम अनु . जमाती, ७ ) वड्री अनु .जमाती स्त्री ,८ ) मनवेल अनु जमाती स्त्री ,९ ) किनगाव बु॥ अनु.जमाती, १० ) पिळोदा खु ॥ अनु. जमाती, ११ ) अनु.जमाती ,कोसगाव अनु.जमाती स्त्री १२ ) मारूळ अनु.जमाती स्त्री १३ ) पाडळसे अनु.जमाती, १४ ) सांगवी खु॥ अनु.जमाती ,१५ ) बोरावल खुर्द अनु.जमाती, १६ ) थोरगव्हाण अनु. जमाती स्त्री ,१७ ) बोराळे अनु.जमाती,१८ ) बामणोद अनु . जमाती स्त्री,१९ ) विरोदे अनु . जमाती ,२० ) चिखली बु॥ अनु. जमाती स्त्री ,२१ ) राजोरा अनु. जमाती ,२२ ) पिंप्री अनु.जाती २३ ) सांगवी बु॥ अनु.जमाती स्त्री, २४ ) अट्रावल अनु.जाती स्त्री,२५ ) कोळवद अनु.जाती स्त्री,२६ ) हंबर्डी अनु.जाती २७ ) म्हैसवाडी अनु.जाती स्त्री ,२८ ) पिंपरूड अनु. जाती, २९ ) नावरे अनु.जाती, ३० ) चिखली खु॥ना. मा.प्रा ३१ ) वढोदा प्रगणे सावदा ना. मा .प्रा स्त्री, ३२ ) न्हावी प्र . अडावद सर्वसाधारण स्त्री,३३ ) चंचाळे सर्वसाधारण स्त्रि, ३४ ) शिरागड सर्वसाधारण,३५ ) कासवे सर्वसाधारण स्त्री ,३६ ) कासारखेडा सर्वसाधारण ,३७ ) नायगाव सर्वसाधारण,३८ )आडगाव सर्व साधारण स्त्री,३९ ) गिरडगाव सर्व साधारण स्त्री , ४० ) डांभुर्णी सर्व साधारण , ४१ ) शिरसाड सर्व साधारण स्त्री ,४२ ) दुसखेडा सर्वसाधारण स्त्री , ४३ ) चिंचोली सर्वसाधारण , ४४ ) कोरपावली सर्वसाधारण स्त्री , ४५ )अंजाळे सर्वसाधारण स्त्री ४६ ) विरावली सर्वसाधारण , ४७ ) डोंगर कठोरा सर्वसाधारण स्त्री , ४८ ) किनगाव सर्वसाधारण , खु॥,४९ ) आमोदे सर्व साधारण ५० )निमगाव सर्वसाधारण ,५१ ) हिंगोणे सर्वसाधारण ,५२ ) सातोद सर्व साधारण ,५३ ) महेलखेडी सर्व साधारण ५४ ) उंटावद सर्वसाधारण स्त्री ५५ ) साकळी सर्वसाधारण स्त्री ,५६ ) न्हावी प्र.यावल सर्वसाधारण ५७ ) भालोद सर्वसाधारण स्त्री , ५८ ) पिळोदा खु सर्वसाधारण,५९ ) चितोडा सर्वसाधारण ६० ) दहिगाव सर्वसाधारण स्त्री ,६१ ) टाकरखेडा सर्वसाधारण ६२ ) वनोली सर्वसाधारण आणी ६३ ) डोणगाव सर्वसाधारण स्त्री साठी आरक्षण निश्चित झाले आहे.
आरक्षण सोडतीच्या वेळी तहसील कार्यालयात गावपातळीवरील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.