जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील खंडेराव नगर जवळील रेल्वे रूळावर धावत्या रेल्वेच्या धक्क्याने अनोळखी अंदाजे ३० वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान मयताची अद्यापपर्यंत ओळख पटलेली नाही, यासंदर्भात रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव शहरातील आत्महत्या कॉलनी आणि खंडेराव नगरच्या दरम्यान असलेल्या रेल्वे रुळावर एका अंदाजे ३० वर्षीय तरूणाचा धावत्या रेल्वेच्या धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी २० एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता उघडकीला आला आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनांसाठी धाव घेतली. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. दरम्यान तरुणाची ओळख पटेल असे कुठलेही कागदपत्र किंवा मोबाईल किंवा इतर साहित्य घटनांसाठी मिळून आले नाही. त्यांच्य हातावर इंग्रजीत दिपक आणि डी लिहिलेले आहे. तर मराठी मॉ असे गोंधलेले असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान मयताची ओळख पाठवावी असे आवाहन तपासाधिकारी पोलीस कॉन्स्टेबल सुशील चौधरी यांनी केले आहे. या संदर्भात रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताची ओळख पटल्यास नातेवाईकांनी रामानंदनगर पोलीस ठाण्याची संपर्क करावा अशी आवाहन केले आहे.