मुक्ताईनगर तालुक्यातील ६१ गावांचे सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर

मुक्ताईनगर- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठीची आरक्षण सोडत नुकतीच तहसील कार्यालयात पार पडली. यामध्ये एकूण ६१ गावांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले असून, यातील ३० गावे महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आली आहेत.

या सोडतीदरम्यान अनुसूचित जातीसाठी ८, त्यापैकी महिलांसाठी ४, अनुसूचित जमातीसाठी ११, त्यातील ६ महिलांसाठी, ओबीसीसाठी १०, त्यातील ५ महिलांसाठी, आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी ३२ गावे, त्यातील निम्म्या म्हणजेच १६ गावे महिलांसाठी राखीव करण्यात आल्या आहेत.

आरक्षणानुसार प्रमुख गावे पुढीलप्रमाणे :

अनुसूचित जाती – राजुरे, शेमळदे, हिवरे, इच्छापुर (सामान्य) आणि बेलसवाडी, हरताळे, खामखेडे, चिंचोल (महिला)

अनुसूचित जमाती – अंतुर्ली, रुईखेडा, भोटा, मेहूण, पिंप्राळा (सामान्य) आणि चांगदेव, धामणगाव, पारंबी, निमखेडी खुर्द, कुर्‍हा, टाकळी (महिला)

ओबीसी – दुई, सुकळी, बोरखेडा, कोर्‍हाळा, मानेगाव (सामान्य) आणि महालखेडा, काकोडा, तरोडा, चिखली, पातोंडी (महिला)

सर्वसाधारण प्रवर्ग –

महिला आरक्षित गावे – चिंचखेडा खुर्द, हलखेडा, लोहारखेडे, बोदवड, पिंपरीपंचम, धामणदे, निमखेडी बु., मेळसांगवे, सातोड, सुळे, जोंधनखेडा, पिंपरी अकाराऊत, वढवे, कर्की, कोथळी

सामान्य गावे – सारोळा, वायला, पुरनाड, उचंदा, घोडसगाव, नायगाव, मोंढळदे, नरवेल, माळेगाव, पिंपरीनांदू, थेरोळा, चिंचखेडे बु., वढोदा, नांदवेल, पंचाणे, चारठाणा

आरक्षण सोडतीच्या वेळी तहसीलदार, विभागीय अधिकारी व ग्रामस्थ यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. निवडणुकीपूर्वीच महिलांना दिलेले हे संधीचं व्यासपीठ ग्रामविकासाला नवी दिशा देईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Protected Content