Home Cities रावेर तपस्विनी अपेक्षा मानेकर व ओंकार रीतापुरे यांचे संस्कृत शास्त्री पदवीत यश

तपस्विनी अपेक्षा मानेकर व ओंकार रीतापुरे यांचे संस्कृत शास्त्री पदवीत यश


सावदा- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | श्री चक्रधर गुरुकुल संस्कृत महाविद्यालयात संपन्न झालेल्या संस्कृत शास्त्री पदवी परीक्षेत श्री दत्त मंदिर, सावदा येथील आचार्य श्री मानेकर बाबा शास्त्री महानुभाव यांचे सतशिष्य तपस्विनी अपेक्षा मानेकर आणि ओंकार रीतापुरे यांनी उत्तम गुणवत्तेसह यश संपादन केले आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेने तसेच परिसरातील संत, महंत, मान्यवर आणि ग्रामस्थांनी या दोघा नवशास्त्र्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. यशाचे श्रेय त्यांनी आपल्या गुरुजन, शिक्षकवर्ग व परिसरातील हितचिंतकांना दिले आहे.

अपेक्षा शास्त्री व ओंकार शास्त्री यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “ही पदवी आमच्या गुरुंच्या आशीर्वादाने व सर्वांच्या पाठबळामुळे शक्य झाली आहे. संस्कृत भाषेचा प्रचार-प्रसार तसेच महानुभाव संप्रदाय व सनातन धर्माच्या प्रचारासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू. तसेच गावाचा व परिसराचा स्वाभिमान वाढवण्यासाठी सातत्याने कार्यरत राहू, असा आमचा दृढ विश्वास आहे.”

सावदा गावासाठी हा क्षण अत्यंत अभिमानास्पद ठरला असून, संस्कृत विद्येच्या पुनरुज्जीवनासाठी कार्य करणाऱ्या या नवशास्त्र्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा…!


Protected Content

Play sound