यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्य शासना व्दारे तालुका पातळीच्या जिल्हा परिषदच्या शाळासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुन्दर शाळा ‘ या अभियांनाच्या पुरस्काराच्या निवडीसाठी मुल्यांकन करणाऱ्या समितीची निवड करण्यात आली असुन तालुका समितीच्या अध्यक्षपदी यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. मंजुश्री गायकवाड यांची निवड करण्यात आली असुन, सदस्यपदी पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी विश्वनाथ चावदस धनके, हेमंत निकम, मुख्यधिकारी नगर परिषद यावल तर सचिवपदी सेवा जेष्ठ विस्तार अधिकारी हबीब तडवी यांची निवड शासन स्तरावर करण्यात आली आहे.
यावल तालुक्यात दिनांक १ जानेवारी २०२४ पासुन ४५ दिवस या कालावधी साठी हे अभियान संपूर्ण यावल तालुक्यातील जिल्हा परिषदच्या शाळांतर्गत चालु राहणार आहे. यात मुल्यांकन समितीच्या वतीने शाळांचे मुल्यांकन करून निवड करण्यात आलेल्या शाळांचे प्रथम, व्दितीय आणि तृतीय पुरस्काराने सन्मानित करण्यासाठी प्रस्तावित करण्यात येणार असल्याची माहितीचे निर्णय पत्र महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचे सह सचिव इम्तीयाज मुश्ताक काझी यांनी शिक्षण विभागाला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे .