यावल पं.समिती गटविकास अधिकारींच्या अभावी विविध कामं प्रलंबित

yaval 2

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील ग्रामपंचायत पातळीवरील ग्रामस्थांच्या समस्यांना न्याय देणारे, कायमचे गटविकास अधिकारी मिळत नसल्यामुळे ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार व गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. वरिष्ठ पातळीवर या विषयाची दखल घेणे अत्यंत गरजे असल्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

याबाबत माहिती अशी की, येथील पंचायत समितीला मिळालेले तत्कालीन गटविकास अधिकारी वाय.पी. सपकाळे यांची यावलहुन काही काळातच बदली झाल्याने त्यांच्या रिक्त असलेल्या पदावर आदी पासुनच पं.स. पुर्व विभाग ग्रामपंचायत विस्तार अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी, जनमाहिती अधिकारी, अपीली आधिकारी अशा पदांवर सेवारत असलेल्या किशोर सपकाळे यांच्याकडे गटविकास अधिकारी यांचे रिक्त असलेल्या पदाचीही प्रभारी म्हणुन जबाबदारी देण्यात आली आहे. एकच व्यक्तीने किती कामे करणार असा प्रश्न पंचायत समितीच्या गोटात चर्चेला जात आहे. एका शासकीय कर्मचाऱ्याने एकाच पगारावर किती पदांवर कामे करायची व ती सांभाळने, त्यास शासनाच्या नियमावलीत बसतील का ? असे विविध प्रश्न येथील ग्रामस्थां मंडळीना पडले आहेत. यामुळे गोंधळलेल्या प्रशासकीय कामकाजावर मोठा परिणाम झाला असल्याने सर्वच पातळीवर ग्रामपंचायतीच्या कामांना विलंब होत असल्याने अनेक विकास कामांचे तिन तेरा होत असल्याने ग्रामस्थ कमालीचे नाराज असल्याचे दिसुन येत आहे. या सर्व पार्श्वभुमीवर जिल्हा परिषदने येथील पं.स. सक्षम अशा कायमस्वरूपी गटविकास अधिकारी यांची तात्काळ नेमणुक करावी अन्यथा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर याचे विपरित परिणाम दिसतील अश्या चर्चाला गावात उधान आले आहे.

Protected Content