यावल प्रतिनिधी । भाजपा सरकार आणलेला शेतकरी कृषि कायद्याच्या विरोधात भारतबंदला यावल येथील महाविकास आघाडीने आपला पाठिंबा दर्शविला आहे.
रावेर विधानसभा मतदार संघाचे आ.शिरीष चौधरी, प्रभाकर सोनवणे, यावल तालुका राष्ट्रीवादी काँग्रेस पक्षाचे यावल तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले, यावल तालुका शिवसेना प्रमुख रवीन्द्र सोनवणे यांच्यासह आदी यावेळी उपस्थिती राहणार आहेत. दरम्यान, पंजाब, हरियाणा, चंडीगढ यासह देशभरातील शेतकऱ्यांनी दिल्ली राज्याच्या सिमेवर मागील १२ दिवसांपासून आंदोलन लोकशाही मार्गाने सुरू केलेले आहे.
तरी 08 डिसेंबर मंगळवार रोजी भारत बंदची हाक दिलेली आहे. या बंदला महाराष्ट्र प्रदेश व जळगाव जिल्हा महाविकास आघाडीने पाठिंबा जाहीर केला आहे. या बंद मध्ये शेतकरी बांधव, व्यापारी, उघोजक, दुकानदार, टपरीधारक, शेतमजुर, सर्व नागरीकयांनी एक दिवस आपले अन्नदाता शेतकरी बाधवांसाठी साठी बंद ठेवुन सहभागी नोंदवावा व शेतकरी आंदोलनाला पाठींबा देऊन भाजप सरकारच्या देशासाठी घातकी असा शेतकरी कायदाचा निषेध व्यक्त करावे असे कॉंग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान, शिवसेनेचे यावल शहरप्रमुख जगदीष कवडीवाले, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे करीम मन्यार यांनी ठिकाण भुसावळ टी पॉईंट सकाळी 10 वाजता महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्तेयांनी उपस्थित रहावे, असे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.