यावल महाविद्यालयाच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजाचे,कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे कनिष्ठ क्रीडा विभागांतर्गत विविध स्पर्धा उत्साहात पार पडल्या.

या स्पर्धेचे उदघाटन प्राचार्य डॉ.संध्या सोनवणे यांनी केले. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा एम.डी.खैरनार, उपप्राचार्य ए. पी. पाटील,उपप्राचार्य प्रा संजय पाटील उपस्थित होते. यावेळी संपन्न झालेल्या स्पर्धतील लांब उडी मुलींमध्ये मध्ये प्रथम वैशाली पाटील. द्वितीय जागृती सूर्यवंशी या विद्यार्थिनींनी यश प्राप्त केले. मुलांमध्ये प्रथम दानीश तडवी यश प्राप्त केले या स्पर्धेत २० विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला.

गोळा फेक स्पर्धेत मुलांमध्ये प्रथम विवेक पाटील द्वितीय अर्जुन पावरा तर मुलींमध्ये प्रथम सारिका अढायगे द्वितीय सानिया तडवी या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले या स्पर्धेत १५ विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला. भाला फेक स्पर्धेत मुलांमध्ये प्रथम विवेक पाटील द्वितीय कृष्णा कंठाळे तर मुलींमध्ये प्रथम नंदिनी महाजन द्वितीय सपना भिलाला या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले.

या स्पर्धेत २२ विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभाग नोंदवला. थाळीफेक स्पर्धेत मुलांमध्ये प्रथम विवेक पाटील द्वितीय अर्जुन पावरा मुलींमध्ये प्रथम नंदिनी महाजन द्वितीय सपना भिलाला या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले या स्पर्धेत ३२ विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला १०० मीटर धावणे स्पर्धेत मुलींमध्ये प्रथम कजीमा तडवी द्वितीय हेमांगी पाटील या विद्यार्थिनींनी यश प्राप्त केले. या स्पर्धेत १५ विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला.

याच बरोबर २०० मीटर धावणे मुलींमध्ये प्रथम सारिका अढायगे द्वितीय मोहिनी भालेराव तर मुलांमध्ये प्रथम मयूर पाटील द्वितीय वंश येवले या विद्यार्थी विद्यार्थिनींनी यश प्राप्त केले या स्पर्धेत २५ विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला. स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. सी. के. पाटील प्रा. ए.जी. सोनवणे प्रा.एम.एच.पाटील.प्रा आर. एस. तडवी प्रा. इ.आर. सावकार प्रा. एम.पी. येवले प्रा.एस.व्ही कदम प्रा.आर. एस. थिगळे यांनी काम पाहिले.

Protected Content