यावल कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात महापुरुषांची जयंती साजरी

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी  | येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात म. गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती इतिहास विभाग, राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात आली.

 

प्रारंभी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे होत्या. प्रमुख वक्ते इतिहास विभागातील गणेश जाधव होते तर प्रमुख उपस्थिती उपप्राचार्य प्रा. ए.  पी.  पाटील, प्रा. एम.  डी. खैरनार, संजय पाटील हे होते. प्रास्ताविक डॉ. अनिल पाटील यांनी केले.  अध्यक्षीय भाषणात  प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांनी म. गांधी यांनी अहिंसा,शांती व विवेक बुद्धीच्या मार्गाने इंग्रजांना नमविले. म. गांधी यांनी शांती व अहिंसाच्या मार्गावर वाटचाल करून भारताला स्वातंत्र्य प्राप्त करून दिले. लालबहादूर शास्त्री यांनी कठीण परिस्थितीवर मात करून भारताला विकासाच्या मार्गावर आणले. अशा थोर पुरुषांचे विचार तरुणांनी आत्मसात करून आचरणात आणावेत असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी प्रमुख वक्ते गणेश जाधव यांनी म. गांधी व लालबहादूर शास्त्री यांचे स्वातंत्र्यसंग्रामातील कार्य व विचार तरुणांसमोर मांडले. तसेच उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार यांनीही मनोगत व्यक्त केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिणी पारधे हिने केले तर आभार लीना पाटील हिने मानले.  कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. एस. पी. कापडे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. आर. डी. पवार, डॉ. सुधा खराटे, डॉ. एच. जी.भंगाळे, डॉ. पी. व्ही. पावरा, मनोज पाटील, अरुण सोनवणे, इ‌. आर. सावकार,मयूर सोनवणे, नरेंद्र पाटील, सी. टी. वसावे, प्रमोद कदम, प्रमोद भोईटे, सचिन बारी यांनी सहकार्य केले.

 

Protected Content