यावल महाविद्यालयात जागतिक आदिवासी दिन व क्रांतीदिन साजरा

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । याव येथील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ९ ऑगस्ट या जागतिक आदिवासी दिन व ऑगस्ट क्रांती दिन या निमित्ताने महाविद्यालया च्या प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला‌.

 

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.अर्जुन पाटील प्रा. एम.डी. खैरनार, प्रा.संजय पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आदिवासी क्रांतिकारक थोर समाज सेवक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा.सुभाष कामडी यांनी आदिवासी दिनाच्या निमित्ताने आदिवासी समाज बांधवांच्या जिवनावर मार्गदर्शनपर  माहिती देताना. आदिवासी संस्कृतीचे जतन संवर्धन,आदिवासींचे अधिकार, निसर्ग,पर्यावरणाचे रक्षण विषयक टिकून राहिलेली अस्मिता, स्वातंत्र्यासाठी आदिवासी क्रांतिकारकांचे योगदान, शासकीय योजना, आदिवासी साहित्य याबद्दल माहिती दिली.

 

 

महाविद्यालयाच्या प्राचार्या. डॉ.संध्या सोनवणे यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आदिवासी दिन व क्रांती दिन हे महत्त्वाचे दिवस आहेत हे सांगताना त्यांनी महात्मा गांधींनी ब्रिटिशांविरुद्ध यांनी ९ ऑगस्ट १९४२ साली  मुंबईतून चलेजाव चळवळ सुरू केली होती.याची आठवण करून दिली.आदिवासी समाज हा पुर्वीपासून डोंगराळ भागात राहणारा निसर्गपुजक आहे, त्यांचे रितीरिवाज, भाषाशैली इतर समाजाहून वेगळी व वैभवशाली  इतिहास लाभला आहे.एकलव्य आणि बिरसा मुंडा हे आदिवासींचे प्रेरणास्थान आहे असे विशद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक. प्रा.सी.टी.वसावे यांनी केले. तर आभार उपप्राचार्य प्रा. एम.डी.खैरनार यांनी मानले. यावेळी कार्यक्रमाला डॉ.पी.व्ही. पावरा,प्रा.डॉ. सुधीर कापडे,प्रा डॉ.हेमंत भंगाळे, प्रा .डॉ.एस.आर.गायकवाड, प्रा.डॉ.आर.डी.पवार,प्रा.मनोज पाटील,प्रा.सी. के.पाटील ,प्रा. एकनाथ सावकारे,प्रा.अरुण सोनवणे,प्रा.राजु तडवी उपस्थित होते. तर प्रा.डॉ.संतोष जाधव,प्रा. नंदकुमार बोदडे, प्रा.मिलिंद मोरे, प्रा. प्रशांत मोरे , प्रा.अर्जुन गाढे,प्रा डॉ.निर्मला पवार, प्रा.डॉ. वैशाली कोष्टी, प्रा.इंगळे मॅडम, संतोष ठाकूर, मिलिंद बोरघडे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले. कार्यक्रमाला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Protected Content