जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेसाठी रावेरातील दोन शाळेंची निवड

raver 1

रावेर प्रतिनिधी । जळगाव जिल्हा क्रीडा खो-खो असोसियनच्या वतीने दि. 8 सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धामध्ये 14 वर्ष वयोगटात रावेर येथील माऊली फाउंडेशन संचलित अदित्य इंग्लिश मिडियम स्कूल आणि श्री. संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थिनींची निवड करण्यात आली आहे.

याबाबत अधि‍क माहिती अशी की, वेदिका महाजन, ईशा पाटील, सलोनी महाजन आणि नेत्रा पाटील या विद्यार्थींनीची निवड करण्यात आली आहे. तर अंजुम तडवी, सलोनी पटवारी, आरती सैनी या तिघांची राखीव जागेसाठी निवड झाल्याबद्दल माउली फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.संदीप पाटील व डॉ.योगिता पाटील यांच्या हस्ते ट्रॉफी व मिडल देऊन सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. यांना मोलाचे मार्गदर्शन क्रिडा शिक्षक मंगेश महाजन यांचे लाभले.

Protected Content