अन्नत्याग आंदोलनासाठी मोठ्या संख्येने कोळी समाज बांधव जाणार : सोनवणे

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी  | कोळी समाज बांधवांना जात प्रमाणपत्र मिळवण्या साठी जळगाव समाजाच्या वतीने होणार्‍या अन्नत्याग आंदोलनास यावल तालुक्यातुन मोठ्या संख्येने समाज बांधव सहभाग घेणार असल्याचा विश्‍वास आज प्रभाकर अप्पा सोनवणे यांनी व्यक्त केला.

यावल तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात आदिवासी टोकरे कोळी समाज बांधवाची बैठक जिल्हा परिषदचे माजी गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे यांच्या अध्यक्षस्थानी संपन्न झाली. या वेळी आदिवासी कोळी समाजाला  जो पर्यत सरसकट जात प्रमाणपत्र मिळत नाही तो लढाई चालु ठेवण्याचा निर्धार आदिवासी कोळी समाज अन्नत्याग उपोषणाची आदिवासी कोळी समाज अन्नत्याग उपोषणाची तयारी करणे व नियोजन बाबत बैठक घेवून चर्चा करण्यात आली.

यावेळी जितेद्र सपकाळे, यशवंत  पहेलवान, आत्माराम कोळी, नामदेव कोळी ,राहुल तायडे ,नंदुभाऊ सोनवणे यांच्यासह यावल तालुक्यातील विविध  संघटनाचे प्रतिनिधी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच,सदस्य समाज बांधव यांच्या उपस्थितीत पार पडली.

यावेळी जळगाव येथे होऊ घातलेल्या अन्नत्याग उपोषणासाठी संपुर्ण रावेर तालुका मोठ्या संख्येने सहभाग घेणार असल्याचे घोषित करण्यात आले. तसेच या उपोषणासाठी रावेर तालुक्यातील महीला,तरुण,विवीध संस्था/संघटना पदाधिकारी, विदयार्थी यांचा सहभागासाठी आवाहन करण्यात आले.

सुलभरित्या सरसकट जात प्रमाणपत्र मिळावे,जळगाव येथे जात पडताळणी समिती कायम स्वरूपी जळगाव येथे यावी इतर समाजाप्रमाणेआदिवासी कोळी समाज विकासासाठी महर्षि वाल्मीकी ऋषी यांच्या नावाने महामंडळ स्थापन करण्यात यावे या प्रमुख मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण चालूच राहिल आंदोलना सदर्भात यावल तालुक्यातुन प्रत्येक गावातुन   लोक स्वखर्चाने जाणार असुन मुलां बाळां सहित काही परिवार तसेच शाळेकरी विद्यार्थी / विद्यार्थीनी तसेच कर्मचारी वर्ग सुद्धा जासतीत संख्यने जाणार आहे.

दरम्यना, कोळी समाजाचे हे शेवटचे आरपार चे आमरण उपोषण असेल. आजपर्यंत सर्वच राजकीय पक्षानी फक्त समाजा चा वापर केला पण आता नाही ही लढाई कोण्या पक्षाची व एका संघटनेची नसुन सर्व पक्षीय संघटनेची व समाज बाधवांची आहे असे प्रभाकर आप्पा सोनवणे यांनी सांगितले. या बैठकीचे सूत्रसंचालन प्रमोद कोळी  यांनी तर सर्व उपस्थितांचे आभार खेमचंद कोळी यांनी केले.

Protected Content