बालाजी महाराज रथोत्सव उत्साहात ; पालिकेबाबत नाराजी

muktai nagar

 

यावल ( प्रतिनिधी) येथील प्रसिद्ध श्री बालाजी महाराज रथोत्सवाची यात्रा मोठया उत्साहाच्या वातावरणात नुकतीच पार पडली. मात्र, सालाबाद प्रमाणे भरणाऱ्या यात्रोत्सवासाठी नगर परिषदचे नियोजन कमी पडल्याची भावना नागरीक व्यक्त करीत होते. पालीकेच्या भोंगळ कारभाराबद्दल नागरिकांमध्ये नाराजी पसरलेली आहे.

 

या संदर्भात अधिक असे की, संपुर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध असलेले श्री बालाजी महाराज रथोत्सव ही यात्रा सालाबाद प्रमाणे आयोजीत करण्यात येते. या श्रीबालाजी महाराजांच्या रथाची विधीवत यावल येथील प्रसिद्ध असलेले श्री व्यास महाराज मंदीरा जवळ हडकाई खडकाई नदीच्या पात्रात पुजा करून रथ ओढण्यास सुरुवात करण्यात येते. हा रथ भक्त ओढुन नदीच्या खडतर मार्गाने शहरातील प्रमुख मार्गाने घेवुन जातात. मात्र यावेळी यावल नगर परिषदच्या कार्यात नियोजनाचा अभाव दिसुन आला. याचे कारण असे की, हडकाई खडकाई नदीला तसे पाणी नसते. मात्र, शिवाजीनगर व इतर वस्तीचे घाण पाणी हे मोठ्या प्रमाणात वाहात असते. नगर परिषद या मार्गाची दुरूस्ती करीत असते. यंदा मात्र नगर परिषदचे नियोजन चुकल्यामुळे घाणीचे पाणीसाठीचा रस्ता रथासाठी अरुंद झाल्याने श्रीबालाजी महराज भक्तातांना रथ ओढतांना त्रास सहन करावा लागला. अरुंद आणि घाणीच्या चिखलातून भाविकांना जावे लागले, या प्रकारामुळे नगर परिषदच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

Add Comment

Protected Content