मौलाना अबुल कलाम आझाद हायस्कूलमध्ये स्कूल कनेक्ट 2.0 अभियानांतर्गत कार्यशाळेचे आयोजन

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | फैजपूर येथील मौलाना अबुल कलाम आझाद हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे ६ जानेवरी २०२५ रोजी महाराष्ट्र शासन व कवियीत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांचे स्कूल कनेक्ट 2.0 अभियान अभियानांतर्गत धनाजी नाना महाविद्यालयच्या वतीने कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

कार्यशाळेत नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२२ संदर्भात स्कूल कनेक्ट 2.0 चे समन्वयक डॉ. ताराचंद सा, प्रा. नाहीदा कुरेशी यांनी इंटरशिप, मूल्यांकन पद्धत आणि अभ्यासक्रमातील लवचिकता, भाषा, क्रेडिट सिस्टीम, विविध स्कॉलरशिप व इंटरशिपबद्दल माहीती दिली. या कार्यशाळेत प्राचार्य हाजी जाकिर व विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content