मोबाईल चोरट्यास अटक; एमआयडीसी पोलीसांची कारवाई

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील खेडी शिवारातील वारकरी भावनाजवळ राहणाऱ्या तरूणाचा महागडा मोबाईलची चोरी केल्याची घटना सोमवारी ६ जानेवारी रोजी मध्यरात्री दीड वाजता समोर आली. यागुन्ह्यातील संशयित आरोपीला एमआयडीसी पोलीसांनी अटक केली. याप्रकरणी दुपारी ३ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय श्रीराम बारेला वय-२४, रा.भगवानपूरा जि.खरगोन मध्यप्रदेश असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

जळगाव शहरातील खेडे शिवारात असलेल्या वारकरी भावनाजवळ रणजीत कुमार सहदेव रॉय वय-३३ हा तरुण वास्तव्याला आहे. दरम्यान सोमवारी ६ डिसेंबर रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास तरुण हा घरात झोपलेला असताना संशयित आरोपी विजय बारेला याने घरातून मोबाईल चोरून नेला. ही घटना उघडकीला आल्यानंतर रणजीत रॉय याने एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी विजय श्रीराम बारेला वय-२४, रा.भगवानपुरा जि. खरगोन मध्यप्रदेश यांच्या विरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच एमआयडीसी पोलिसांनी चोरट्याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल संधी फुले करीत आहे.

Protected Content