बोदवड न्यायालयात ‘नवीन कायदे व त्यांची अंमलबजावणी’ कार्यशाळा संपन्न

बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बोदवड तालुका विधीसेवा प्राधिकरणाचा व बोदवड न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमानाने बोदवड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात पक्षकारांना न्याय सुलभ व जलद मिळण्यासाठीच नवे कायदे केले आहेत. नवीन कायदे व त्यांची अंमलबजावणी यावर आयोजित कार्यशाळेत ॲड. अर्जुन पाटील हे बोलत होते. यावेळी ॲड. अर्जुन पाटील अध्यक्ष बोदवड तालुका वकील संघ यांनी प्रतिपादन केले की, १ जुलै २०२४ पासुन नवे कायदे आमलात आणले आहे ते जनहितासाठीच आहे. जनतेला न्यायदानाची प्रक्रिया सुलभ होण्यासाठी नागरिकांनी नवीन कायद्यांचा अभ्यास केला पाहिजे.

आताचे हे ब्रिटिश कालीन आहेत त्यामुळे शिक्षेची तरतूद त्यांनी त्यांच्या प्रमाणे आजही केली जाते मात्र आता त्यात बदल करणे ही काळाची गरज आहे त्यानुसार हे नवीन कायदे सोमवारपासून लागू झाले आहेत त्याबद्दल कोणताही चुकीचा समज न बाळगता हे बदल सकारात्मकतेने स्वीकारावे असे आवाहन बोदवड तालुका वकील संघाचे अध्यक्ष एडवोकेट अर्जुन पाटील यांनी केले आहे.

ब्रिटिशकालीन कायदे आता भारतीय दंड संहिता ऐवजी भारतीय न्याय संहिता 2023 सीआरपीसी च्या जागी भारतीय नागरिक सुविधा संहिता 2023 आणि भारत पुरावा कायदा च्या जागी भारतीय साक्ष अधिनियम 2023 हे कायदे आज पासून लागू झाले आहेत. या नव्या फौजदारी कायद्यातील महत्त्वाच्या बदलाची माहिती व्हावी यासाठी बोदवड तालुका वकील संघ, विधी सेवा प्राधिकरण याच्या वतीने बोदवड न्यायालात या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेमध्ये पक्षकार , वकील बांधव व न्यायालयीन कर्मचारी वर्ग हे सहभागी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायाधिश क्यु.यु.एन शरवरी हे होते. बोदवड तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अर्जुन पाटील, सचिव ॲड. धनराज सी. प्रजापती, ॲड.के.एस इंगळे, ॲड. किशोर महाजन, यांनी अभ्यासपुर्ण मार्गदर्शन केले.बोदवड पोलीस स्टेशनचे पी एस आय शेजोळे साहेब व त्याची पोलीस मंडळी यावेळी उपस्थित होते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमास विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष योगेश पाटील तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन हे ॲड के एस इंगळे यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वीते साठी ॲड. निलेश लढे, ॲड.विजय मंगळकर, न्यायालयीन अधिक्षक वैभव तरटे, प्रशांत बेदरकर ,व्ही.एन. गरड, परमेश्वर जाधव ,अविनाश राठोड, आर.पी.साबळे, ए.पी.सूर्यवंशी,संतोष पाटील यांनी परीश्रम घेतले. सदर कार्यक्रमास तालुक्यासह नागरीक व वकील बांधव मोठ्या संख्येने हे उपस्थित होते.

Protected Content