जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | इकरा शिक्षण संस्था संचलित एच जे थीम कला व विज्ञान महाविद्यालय मेहरून जळगाव येथे गणित विभागातर्फे “अप्लाइड मॅथेमॅटिक्स” या विषयावर एक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत प्रमुख अतिथी म्हणून तुर्की येथील प्राध्यापक डॉक्टर मोहम्मद कुरुले तसेच अलिगड मुस्लिम विद्यापीठ अलीगड येथील प्राध्यापक डॉक्टर शाकीर अली यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी इकरा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष माननीय डॉक्टर इकबाल शाह हे होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना गणित विभाग अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सदाशिव डापके यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक मुजम्मील काजी यांनी उत्कृष्टरित्या केले. कार्यक्रमाची सुरुवात कुरान पठणाने करण्यात आली. त्यानंतर महाविद्यालयाचा गीत तराने ईकरा मिनाज खान यांनी गायले. प्राध्यापक शाकीर अली यांनी गणित या विषयाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.
प्रा. डॉ. मोहम्मद कुरुले यांनीही जीवनात गणिता चे महत्व किती? हे विद्यार्थ्यांना पटवून दिले. अध्यक्ष भाषणात प्राध्यापक डॉक्टर इकबाल शाह, विभाग यांनी सांगितले की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये गणित 3आवश्यक आहे त्याशिवाय कोणतीच गोष्ट शक्य नाही साधारण चहा बनवण्यासाठीही आपल्याला मोजमाप करावे लागते. या कार्यक्रमासाठी प्रभारी प्राचार्य डॉक्टर चांदखान, उपप्राचार्य प्रा. डॉक्टर वकार शेख , उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर तनवीर खान , तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक मंडळी, शिक्षकेत्तर कर्मचारी , तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.