मेहनत करा, उत्पन्न वाढवा ! : महागाईवर बाबा रामदेव यांचा सल्ला

कर्नाल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सर्वसामान्यांचे जगणे महागाईमुळे मुश्कील झाले असतांना योगगुरू बाबा रामदेव यांनी नागरिकांना कठोर परिश्रम करून आपले उत्पन्न वाढविण्याचा सल्ला दिला आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे महागाई कडाडली आहे. दरम्यान, योगगुरू बाबा रामदेव यांनी लोकांना वाढत्या महागाईला सामोरे जाण्यासाठी सल्ला दिला आहे. करनाल येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान बाबा रामदेव यांना गेल्या आठवडाभरात सातत्याने होत असलेल्या इंधन दरवाढीबाबत विचारण्यात आले असता, ते म्हणाले की, या महागाईला तोंड देण्यासाठी सर्वसामान्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. लोकांना त्यांचे उत्पन्न वाढवावे लागेल, त्यासाठी कठोर परिश्रम करण्याची गरज असल्याचे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे. अर्थात, लोकांनी आता आपले उत्पन्न वाढवावे हाच पर्याय असल्याचे रामदेव यांनी  नमूद केले. महागाई आहे तर काही उत्पन्न वाढवावे लागेल. अधिक मेहनत करावी लागेल. मी संन्यासी असल्याने १८-१८ तास काम करतो. इतर लोकही काम करतील तर कमावतील आणि महागाईही सहन करतील. देशाची प्रगती होईल असे त्यांनी नमूद केले.

बाबा रामदेव हे आधी इंधनाच्या मूल्यवाढीवरून अनेकदा जाहीर भाष्य करत असत. अलीकडच्या काळात मात्र त्यांनी याबाबत कोणतेही वक्तव्य केले नसून आता तर त्यांनी लोकांनाच उत्पन्न वाढविण्याचा सल्ला देऊन टाकला आहे. दरम्यान, आपण ’द काश्मीर फाइल्स’ चे काही भाग पाहिले आहेत. ज्या लोकांनी भारताला एकाकी पाडले आहे. हे क्षुद्र राजकारण आहे. त्यांच्याकडून धडा घेतला पाहिजे असे ते म्हणाले. तर,  बाबा रामदेव म्हणाले की, माझे संपूर्ण जीवन योग आणि योगासाठी आहे. योगधर्म हा या काळातील युगधर्म आहे. हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांचे कौतुक करताना बाबा रामदेव म्हणाले की, योगाऐवजी उत्तम काम करणार्‍या मनोहर लाल यांच्यावर चित्रपट बनवायला पाहिजे.

 

Protected Content