अखेर मनसेचे आमरण उपोषण मागे

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील फैजपूर (न्हावी) येथील मधुकर सहकारी साखर कारखान्यासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सोमवारपासून आमरण उपोषण सुरू केले होते. दरम्यान, मसाकाच्या संचालक मंडळाने शेतकरी व कामगारांचा विचार करून साखर कारखानदारांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

तर या उपोषणाला कारखाना कामगारांनी देखील आपला पाठींबा दिला होता. मधुकर सहकारी साखर कारखाना न्हावी तालुका यावल लवकरात लवकर भाडेतत्त्वावर देऊन सुरू करण्यात याव्यात व त्यासाठीची निविदा प्रक्रिया तातडीने राबविण्यात यावी सह विविध मागण्यांसाठी मनसेने कडून जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांच्याकडे निवेदन दिले होते. मात्र, वेळेत मागण्या मान्य न झाल्यामुळे सोमवारपासून मनसेच्या वतीने मधुकर सहकारी साखर कारखाना येथे आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते. दरम्यान बुधवारी मसाका चेअरमन शरद महाजन सह संचालकांनी उपोषकर्त्यांची भेट घेवुन कारखाना सुरू झाला पाहिजे. तसेच थकीत कर्ज संर्दभात जिल्हा बँकेकडून मिळालेली नोटीस आणी त्या दृष्टीने संचालक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बैठकीतील निर्णय या बाबत चर्चा करण्यात आली. भविष्यात कारखाना सुरू झाला पाहिजे म्हणुन सर्व संचालक मंडळ प्रयत्नशिल असुन शेतकऱ्यांची देणगी चुकती केली जाईल व कामगारांना काम मिळेल असे अश्वासन मसाकाचे चेअरमन शरद जिवराम महाजन यांनी दिले व या आश्वासनानंतर मनसेचे जनहित जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर, किशोर नन्नवरे, अजय तायडे, गौरव कोळी, अनिल सपकाळे या पदाधिकाऱ्यांच्या आमरण उपोषणाची सांगता झाली.

 

Protected Content