रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून रावेर-यावल परिसरातील महिलांना लखपती बनविण्याचा प्रयत्न भाजपा सरकार करत आहे, असे मत भाजपा जिल्हाध्यक्ष अमोलभाऊ हरिभाऊ जावळे यांनी व्यक्त केले.
रावेर येथील अग्रसेन मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या बहिणींचा ऑनलाइन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाइन संवाद साधला. यावेळी महिलांनी “आपला भाऊ देवा भाऊ” आणि “आपला भाऊ अमोल भाऊ” अशा घोषणा देत अमोल जावळे यांना राखी बांधली. यावेळी उपस्थित महिलांनी आगामी काळात भाजपाच्या पुन्हा संधी देऊन लाडक्या बहिणी “देवा भाऊ”ना आशीर्वादरूपी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहू, असा शब्द दिला.
या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती होती. भाजपा सहा विधानसभा प्रमुख नंदकिशोर महाजन, महिला जिल्हाध्यक्ष रंजना प्रल्हाद पाटील, ज्येष्ठ नेते सुरेश धनके, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील, तालुकाध्यक्ष महेश चौधरी, माजी तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, संदीप सावळे, सि एस पाटील, हरलाल कोळी दुर्गेश पाटील, नितिन पाटील,सौ रेखा बांडे यांच्यासह अनेक भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.