Home धर्म-समाज वरणगाव येथील महिलांचे नगरपालिकेसमोर उपोषण

वरणगाव येथील महिलांचे नगरपालिकेसमोर उपोषण

0
32

वरणगाव प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील वरणगाव नगरपरिषदेच्या मनमानी कारभाराला कंटाळून माजी नगरसेविका माला मेढे यांच्या नेतृत्वाखाली आज नगरपालिके समोर सिद्धेश्वर नगरातील महिलांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे‌‌.

भुसावळ तालुक्यातील सिद्धेश्वर नगर येथील रहिवाशांचे पंतप्रधान योजनेतून घरकुल मंजूर झाले आहे तरीसुद्धा नगरपालिका याकडे दुर्लक्ष करताहेत लाभार्थ्यांना या लाभापासून वंचित ठेवले जात असून यासंदर्भात निवेदनेही दिली आहे. महिलांनी मोर्चा काढला तरी देखील याची दखल घेतली नाही. म्हणून आज वरणगाव येथील सिद्धेश्वर नगरातील महिलांनी माजी नगरसेविका माला ताई मेढे यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेसमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

 


Protected Content

Play sound