Home Cities जळगाव प्रा. पंकज नाले यांना ‘सेवागौरव पुरस्कार’ जाहीर

प्रा. पंकज नाले यांना ‘सेवागौरव पुरस्कार’ जाहीर

0
164

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जळगाव येथील जनमत प्रतिष्ठानचे प्रा. पंकज नाले यांची ‘सेवागौरव पुरस्कार’ासाठी निवड करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील सु-लक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि माणुसकी वृद्ध सेवालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या ९ व्या वर्धापनदिन सोहळ्यात त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

सु-लक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, माणुसकी वृद्ध सेवालय आणि माणुसकी रुग्णसेवा समूह यांच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सेवागौरव पुरस्काराने सन्मानित केले जाते. सन २०२५-२०२६ या वर्षासाठीही विविध क्षेत्रातील मान्यवरांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या प्रा. पंकज नाले यांचा समावेश आहे.

या सोहळ्याचे आयोजन माणुसकी समूहाच्या ९ व्या वर्धापनदिनानिमित्त तसेच कुमार राम सुमित पंडित यांच्या ८ व्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सामाजिक युवा पुरस्कार, क्रीडा युवा पुरस्कार, कला युवा पुरस्कार, पत्रकारिता पुरस्कार, आरोग्य सेवक पुरस्कार, युवा उद्योजक पुरस्कार, कृषिभूषण पुरस्कार, भारूडरत्न तसेच शाहीर पुरस्कार, महाराष्ट्र पोलीस पुरस्कार अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे.

प्रा. पंकज नाले यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेत त्यांची या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या कार्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यास हातभार लागला असून त्यांच्या या योगदानाचा गौरव या पुरस्काराद्वारे करण्यात येणार आहे.

या भव्य सोहळ्यात रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. “मानवसेवा हीच ईश्वरसेवा” या संदेशाला अनुसरून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन समाजसेविका पूजा पंडित (सचिव) आणि समाजसेवक सुमित पंडित (संस्थापक अध्यक्ष) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून, कार्यक्रम भव्यदिव्य पद्धतीने पार पडणार आहे.


Protected Content

Play sound