तरूणी, महिला आणि विद्यार्थीनींच्या सुरक्षिततेसाठी हेल्पलाईन कार्यान्वित

Police logo

जळगाव प्रतिनिधी । शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थीनींसह तरूणी व महिलांच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ पोलीस मदत मिळावी या उद्देशाने जिल्ह्यात महिला पोलिसांचे निर्भया पथक / दामिनी पथकासह हेल्पलाईनसाठी तीन संपर्क क्रमांक कार्यान्वित करण्यात आले आहे. यासाठया पथकासाठी स्वतंत्र वाहन असून यात वाहनचालक, पोलीस अधिकारी व कर्मचारीही महिलाच आहेत.

शाळा व महाविद्यालय परिसरात विद्यार्थीनींची छेड काढण्याचे प्रकार घडत असतात. यातून महिला विरुध्द अत्याचाराचे गुन्हे घडतात. या शिवाय सार्वजनिक ठिकाणी, प्रवासातही या विद्यार्थीनींना तरूणी व महिलांना छेडछाड, लगट आदी अनुभव येत असतात. नोकरी, कामाच्याठिकाणीही अशा प्रसंगांना त्यांना तोंड द्यावे लागते. घरगुती वादातून महिलांवरील होणारे अत्याचारही होत असतात. महिलांची सुरक्षितता व त्यांना तातडीने पोलीस मदत मिळावी म्हणून पोलिसांची निर्भया, दामिनी पथके कार्यान्वित आहेत. जळगाव शहरासाठीही निर्भया पथक, दामिनी पथक कार्यान्वित आहे .

या पथकासाठी स्वतंत्र वाहन दिलेले आहे. शहरातील शाळा, महाविद्याल, सार्वजनिक ठिकाणी हे पथक सकाळी ९ ते रात्री ९ दरम्यान जळगाव गस्त घालत असतात. पोलिसांना विद्यार्थीनी, तरुणी, महिलांच्या तक्रारी आल्यास तातडीने घटनास्थळी पोहचून मदत केली जाते. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थीनींसह तरूणी व महिलांच्या सुरक्षिततेसाठी तसेच त्यांना तात्काळ पोलीस मदत मिळावी म्हणून पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले याचे संकल्पनेतून पोलीस नियंत्रण कक्ष जळगाव येथे खालील प्रमाणे हेल्पलाईन मोबाइल क्रमांकाची सुविधा (२४ x ७) कार्यान्वित केली आहे.

हेल्पलाईन मोबाइल क्रमांक खालील प्रमाणे उपलब्ध आहेत.
९८६०५०१०९१ – शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थीनींसह तरूणी व महिलांच्या सुरक्षिततेसाठी
८९५६७१५१०० – जळगाव जिल्यातील नागरिकांकरिता तात्काळ सेवेकरिता
९८६०५०१०९१ – जळगांव जिल्यातील नागरिकांकरिता तात्काळ सेवेकरिता

प्रत्येक पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी हे संबंधित पोलीस ठाण्याचे अंतर्गत शाळा, महाविद्यालय यांना दररोज भेट देऊन प्राचार्य, मुख्याध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांच्या उपस्थितीत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थीनींसह तरूणी व महिलांच्या सुरक्षिततेसाठी चर्चा करणार आहेत.

१) “पोलीस काका / पोलीस दीदी” योजना – शाळा तसेच महाविद्यालयात घडणाऱ्या विविध गुन्हेगारी घटना ( रॅगिंग, अंमली पदार्थ सेव्हन , सायबर गुन्हे , मुलींची छेडखानी इत्यादी ) वर वेळेवर नियंत्रण मिळवण्याकरिता पोलीस व विध्यार्थी नाते तयार करण्याकरिता पोलीस स्टेशन स्तरावर ” पोलीस काका / पोलीस दीदी ” योजना ही योजना राबविली आहे.

२) “Buddy Cop” संकल्पना :- महिला संबधी घडलेल्या काही दुर्दवी घडण्याचे पार्श्वभूमीवर महिलांचे सुरक्षिततेसाठी व महिलांना विशेषतः वेगवेगळ्या कंपन्या / आयटी हब व महत्त्वाचे ठिकाणी जिथे रात्री उशिरापर्यंत महिला काम करतात अशा महिलांना सुरक्षिततेची भावना प्रदान करणे साठी ” Buddy Cop ” संकल्पना पोलीस स्टेशन स्तरावर राबविली आहे.

३) “जागरूक नागरीक” अभियान – गुन्हे प्रतिबंध करण्याचे अनुषंगाने नागरिकांना जागरूक करून त्यांचे मध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी ,त्यांना स्वतःचा , परिवाराच्या व मालमत्ते बाबत सावध व सजक करण्यासाठी “जागरूक नागरीक” अभियान मोहिम पोलीस स्टेशन स्तरावर राबविली आहे.

Protected Content