राज्यसभेतही नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर

नवी दिल्ली वृत्तसंस्था । लोकसभेनंतर राज्यसभेतही नागरिकत्व सुधारणा विधेयकाला मंजुरी मिळाली असून यात शिवसेनेने मतदानात भाग न घेता वॉकआऊट केले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत आज दुपारी नागरिकत्व सुधारणा विधेयक मांडले. या विधेयकावर ६ तासाहून अधिक वेळ चर्चा केल्यानंतर रात्री ८ नंतर मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली. यावेळी विधेयक मंजूर करण्याच्या बाजूने १२५ मते पडली आणि विधेयकाविरोधात १०५ मतं पडली. या मतदान प्रक्रियेत एकूण २३० सदस्यांनी सहभाग घेतला. विधेयक मंजूर झाल्यानंतर राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी सभागृहाचं कामकाज तहकूब केलं.

Protected Content