निवडणुकीसाठी आता १९० मुक्त चिन्हे उपलब्ध

मुंबई प्रतिनिधी । नोंदणीकृत राजकीय पक्ष व अपक्षांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आता ४८ ऐवजी १९० मुक्त चिन्हे उपलब्ध केली असल्याची माहिती आज निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली.

राज्य निवडणूक आयोगाच्या १८ जानेवारी २०१७ च्या अधिसूचनेनुसार ४८ मुक्त चिन्हे निश्‍चित करण्यात आली होती. त्यात आता ३० नोव्हेंबर २०१९ रोजीच्या अधिसूचनेनुसार १४२ नव्या चिन्हांची भर घालण्यात आली आहे. त्यामुळे ही संख्या आता १९० झाली असून निवडणूक आयुक्त मदान यांनी आज ही माहिती दिली.

राज्य निवडणूक आयोगाच्या ३० नोव्हेंबर २०१९ च्या अधिसूचनेनुसार मुक्त चिन्हांची यादी (यातील ४८ क्रमांकापर्यंतची चिन्हे यापूर्वीदेखील होती): १) कपाट, २) ब्रश, ३) डिझेल पंप, ४) इस्त्री, ५) करवत, ६) तंबू, ७) फुगा, ८) केक, ९) विजेचा खांब, १०) जग, ११) कात्री, १२) व्हायेलीन, १३) टोपली, १४) कॅमेरा, १५) काटा, १६) किटली, १७) शिवणयंत्र, १८) चालण्याची काठी, १९) बॅट, २०) मेणबत्ती, २१) कढई, २२) शटल, २३) शिटी, २४) फलंदाज, २५) छताचा पंखा, २६) गॅस सिलेंडर, २७) पत्रपेटी, २८) पाटी, २९) विजेरी (टॉर्च), ३०) कोट, ३१) काचेचा पेला, ३२) मका, ३३) स्टूल, ३४) फळा, ३५) नारळ, ३६) हार्मोनियम, ३७) नगारा, ३८) टेबल, ३९) पाव, ४०) कंगवा, ४१) हॅट, ४२) अंगठी, ४३) टेबल लॅम्प, ४४) ब्रिफकेस, ४५) कपबशी, ४६) आईसक्रीम, ४७) रोड रोलर ४८) दूरदर्शनसंच, ४९) एअर कंडिशनर, ५०) सफरचंद, ५१) ऑटो रिक्षा, ५२) पांगुळ गाडा, ५३) मण्यांचा हार, ५४) पट्टा, ५५) बाकडे, ५६) सायकल पंप, ५७) दुर्बिण, ५८) बिस्किट, ५९) होडी, ६०) पुस्तक, ६१) पेटी, ६२) ब्रेड टोस्टर, ६३) विटा, ६४) बादली, ६५) बस, ६६) गणकयंत्र, ६७) ढोबळी मिर्ची, ६८) गालिचा, ६९) कॅरम बोर्ड, ७०) खटारा, ७१) फुलकोबी, ७२) सीसीटीव्ही कॅमेरा, ७३) साखळी, ७४) जाते, ७५) पोळपाट लाटणे, ७६) बुद्धिबळ, ७७) चिमणी, ७८) चिमटी/ क्लिप, ७९) नारळाची बाग, ८०) रंगाचा ट्रे व ब्रश, ८१) संगणकाचा माऊस, ८२) संगणक, ८३) क्रेन, ८४) घन ठोकळा, ८५) हिरा, ८६) डिश अँन्टेना, ८७) दरवाज्याची घंटी, ८८), दरवाज्याची मूठ, ८९) ड्रील मशीन, ९०) डंबेल्स, ९१) कानातले दागिने (कर्णफुले), ९२) लिफाफा, ९३), एक्सटेंशन बोर्ड, ९४) बासुरी, ९५) फूटबॉल, ९६) कारंजे, ९७) नरसाळे, ९८) ऊस, ९९) भेट वस्तू, १००) आले, १०१) चष्मा, १०२) द्राक्षे, १०३) हिरवी मिरची, १०४) हात गाडी, १०५) हेड फोन, १०६) हेलिकॉप्टर, १०७) हेल्मेट, १०८) हॉकी, १०९) वाळूचे घड्याळ, ११०) पाणी गरम करण्याचे हिटर, १११) फणस, ११२) चावी, ११३) भेंडी, ११४) लॅपटॉप, ११५) कडी, ११६) लाईटर, ११७) ल्यूडो, ११८) जेवणाचा डब्बा, ११९) काडेपेटी, १२०) माईक, १२१) मिक्सर, १२२) नेल कटर, १२३) गळ्यातील टाय, १२४) कढई, १२५) भूईमुग, १२६) पेर, १२७) वाटाणे, १२८) पेन ड्रॉईव्ह, १२९) पेनाची नीब, १३०) पेन स्टँड, १३१) कंपास पेटी, १३२) पेन्सिल शार्पनर, १३३) खलबत्ता, १३४) पेट्रोल पंप, १३५) फोन चार्जर, १३६) उशी, १३७) अननस, १३८) प्लास्टर थापी, १३९) जेवणाची थाळी, १४०) घागर, १४१) पंचिंग मशीन, १४२) फ्रिज, १४३) रूम कुलर, १४४) रबरी शिक्का, १४५) सेफ्टी पीन, १४६) करवत, १४७) शाळेची बॅग, १४८) स्कुटर, १४९) बोट, १५०) शटर, १५१) शितार, १५२) दोरी उडी, १५३) साबण, १५४) मोजे, १५५) सोफा, १५६) पाना, १५७) स्टॅप्लर, १५८) स्टेथोस्कोप, १५९) स्टम्प, १६०) सूर्यफूल, १६१) झोका, १६२) स्वीच बोर्ड, १६३) इंजेक्शन, १६४) टीव्ही रिमोट, १६५) टॅक्सी, १६६) चहाची गाळणी, १६७) दूरध्वनी, १६८) भाला फेकणारा, १६९) नांगर, १७०) चिमटा, १७१) दातांचा ब्रश, १७२) दातांची पेस्ट, १७३) टॅक्टर, १७४) बिगूल, १७५) तुतारी, १७६) टाईप रायटर, १७७) टायर्स, १७८) छत्री, १७९) वॅक्यूम क्लिनर, १८०) वॉल हूक, १८१) पाकिट, १८२) अक्रोड, १८३) कलिंगड, १८४) पाण्याची टाकी, १८५) विहीर, १८६) पवन चक्की, १८७) खिडकी, १८८) सूप, १८९) कॅन आणि १९०) लोकरीचा गुंडा व सुई.

वर नमूद केलेली १९० चिन्हे आता उपलब्ध राहणार असल्याची माहिती मदान यांनी दिली.

Protected Content