बंजारा समाजातील महिलांनी शिक्षण क्षेत्रात पुढे यावे; सुभाष जाधव यांचे आवाहन

अमळनेर प्रतिनिधी । अनादी काळापासून नारी शक्तीची महिमा मोठी आहे. महिलांनी खऱ्या अर्थाने हिंदू संस्कृती टिकवून ठेवीत आजही परंपरा आणि संस्कृती यांची जोपासना त्यांनी केली असून बंजारा समाजातील स्रियांनी शिक्षण क्षेत्रात पुढे यावे, असे प्रतिपादन वसंतनगर ता.पारोळा येथे वसंतराव ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी केले.

यावेळी कार्यक्रमाला अखिल भारतीय बंजारा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कांतीलाल नाईक, गजमल जाधव, अभेराम जाधव, संतोष जाधव, आत्माराम जाधव, अशोक जाधव,  जवाहर जाधव, भरत जाधव, एकनाथ जाधव, रोहिदास जाधव, मनोज जाधव, बछराज जाधव, चेतन जाधव, विनोद जाधव, कमल जाधव, करतार जाधव,  सुरेश जाधव, विठ्ठल जाधव, मुख्याध्यापक सी. के.पोतदार, प्राथमिक मुख्याध्यापक सोपान पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी दुर्गा मातेच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.

सुभाष जाधव यांनी महिला आणि तिचे परिवारातील अस्तित्व यांचे महत्त्व  सांगितले. कांतीलाल नाईक यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सूत्रसंचालन प्रा.हिरालाल पाटील यांनी केले.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!