Home क्राईम धावत्या बसमधून महिलेची सोन्याची मंगलपोत लंपास

धावत्या बसमधून महिलेची सोन्याची मंगलपोत लंपास

0
106

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव ते छत्रपती संभाजी नगर बसमधून एका महिलेची ९० हजार रूपये किंमतीची सोन्याची मंगल पोत अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची धक्कादायक घटना मंगळवारी १० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास समोर आली आहे. याबाबत रात्री ११ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, सुनिता अशोक बारी वय ५२ रा. पिंप्राळा या महिला पहूर पाळधी येथे लग्नाला नातेवाईकांकडे जाण्यासाठी मंगळवारी १० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता जळगाव बसस्थानक येथून छत्रपती संभाजी नगर या बस मध्ये प्रवास करत होत्या. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पिशवीला धारदार शस्त्राने कापून पिशवीतील ९० हजार रूपये किंमतीची सोन्याची मंगलपोत चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी जळगावातील जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ भटू पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound