Home क्राईम चौघांकडून महिलेचा विनयभंग; शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल

चौघांकडून महिलेचा विनयभंग; शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल

0
169


जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील एका नगरात राहणाऱ्या एका महिलेचा अंगावरील साडीचा पदर फाडून विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या संदर्भात शनिपेठ पोलीस ठाण्यात 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका नगरात 38 वर्षीय महिला ही आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. दरम्यान एक वाजता महिलाही मंदिरातील असताना त्या ठिकाणी संशयित आरोपी लखन भगवान सारवान, सोनू भगवान सारवान, विक्रम राजू सावंत आणि सुरज राजू सावंत सर्व रा. गुरुनानक नगर यांनी महिलेच्या पदराला हात लावला. आणि पदर फाडून विनयभंग केला. ही घटना घडल्यानंतर पीडित महिलेने शनी पेठ पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दिली. त्यानुसार शनिपेठ पोलीस ठाण्यात चौघांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रतिभा पाटील करत आहे.


Protected Content

Play sound