Home Cities अमळनेर कारण नसतांना शिवीगाळ व मारहाण करत महिलेचा विनयभंग

कारण नसतांना शिवीगाळ व मारहाण करत महिलेचा विनयभंग

0
211

अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील नगाव येथील एका ५२ वर्षीय महिलेला काहीही कारण नसतांना शिवीगाळ व मारहाण करून विनयभंग केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार शनिवारी ५ जुलै रोजी रात्री १०.३० वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील नगाव येथे ५२ वर्षीय महिला ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. १७ मार्च रोजी काहीही कारण नसतांना गावात राहणारे धनराज डिगंबर गोसावी, समाधान धनराज गोसावी, शुभम धनराज गोसावी आणि सुनंदा धनराज गोसावी सर्व रा. नगाव यांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच महिलेचा साडीचा पदर ओढून त्यांचा विनयभंग केला आणि जीवेठार मारण्याची धमकी दिली. या घटनेसंदर्भात महिलेने अमळनेर न्यायालयात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने ४ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशानुसार शनिवारी ५ जुलै रोजी रात्री १०.३० वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी धनराज डिगंबर गोसावी, समाधान धनराज गोसावी, शुभम धनराज गोसावी आणि सुनंदा धनराज गोसावी सर्व रा. नगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय भोई हे करीत आहे.


Protected Content

Play sound