Home Uncategorized एक वर्षाच्या चिमुकलीसह महिला बेपत्ता !

एक वर्षाच्या चिमुकलीसह महिला बेपत्ता !

0
203


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील राहत्या घरातून कुणाला काहीही न सांगात २५ वर्षीय विवाहिता आपल्या एका वर्षाच्या चिमुकल्या मुलीसह बेपत्ता झाल्याची घटना २८ जुलै रोजी दुपारी ३ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी बुधवारी ३० जुलै रोजी दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

वत्सलाबाई सुकलाल भिल (वय ७२ वर्षे, रा. शिरसोली, ता. जळगाव) यांनी याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये खबर दिली आहे. वत्सलाबाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची मुलगी नर्मदा राजू भिल (वय २५ वर्षे) ही २८ जुलै रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घरातून निघून गेली. तिच्यासोबत तिची एक वर्षाची मुलगी नंदिनी राजू भिल देखील आहे. मुलगी व नात बेपत्ता झाल्यानंतर वत्सलाबाई यांनी दोघांचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी पोलिसांत हरवल्याची खबर दिली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ धनंजय गुळवे हे करत आहेत.


Protected Content

Play sound