चाळीसगाव प्रतिनिधी । अज्ञात ट्रॅक्टर चालकाने अचानक ब्रेक लावल्याने मागून भरधाव येणाऱ्या चारचाकी वाहनाची जोरदार धडक दिल्याने महिला जागीच ठार झाल्याची घटना चाळीसगाव-धुळे रोडवरील अमृत जिनिंग ते भोरस फाट्याजवळ घडली. याबाबत ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की, चाळीसगाव- धुळे रोडवर भरधाव ट्रकने अचानक ब्रेक लावल्याने मागून येणारी टाटा माझा कंपनीच्या गाडीचा (क्र. एम.एच.२३-ड्ब्लू ००८७) जोरदार धडक लागला. या अपघातात माधुरी नितीन चव्हाण या महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर पती नितीन सुरेश चव्हाण (वय- ४५ रा. भडगाव रोड ता. चाळीसगाव) हे जखमी झाले आहे. ही घटना मंगळवार, २५ रोजी सकाळी ५.४५ वाजेच्या सुमारास अमृत जिनिंग ते भोरस फाट्याजवळ घडली. घटना घडताच अज्ञात ट्रॅक्टर चालक (नाव गाव माहीत नाही) हा पसार झाला. या अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पती नितीन सुरेश चव्हाण याच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस स्थानकात भादवी कलम- ३०४ (अ), २७९, ३३७, ४२७ व मोटार वाहन अधिनियम १३४ ब नुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सहा पोलिस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे हे करीत आहेत.