
यावल-अय्यूब पटेल | तालुक्यातील डांभुर्णी गावात आज एक वयोवृध्द महिला मयत झाल्यावर पुन्हा जीवंत झाल्याची घटना घडल्याने चर्चेला उधाण आले. तथापि, काही वेळानंतर तिने पुन्हा जक्षाचा निरोप घेतला. परिसरात याच घटनेची चर्चा सुरू आहे.
यावल तालुक्यातील डांभुर्णी येथील एका ९२ वर्षीय वयोवृद महिलेचे निधन झाल्याची वार्ता मिळतात सर्व नातेवाईक अंत्यसंस्कारा करीता डांभुर्णी येथे पोहोचले अंत्यविधीची तयारी झाली मृतात्म्यास अखेरची आंघोळ घालण्यात येत असतांना, अचानक मरण पावलेल्या वृद्धीने आपल्या सुनेचा हात पकडला व डोळे उघडले. वृद्धा जिवंत पाहून नातेवाईकांना आनंद झाला, मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही. काही नातेवाईक त्यांची भेट घेवुन मार्गस्थ झाल्याच्या सुमारे अर्ध्या तासानंतर त्या म्हातारीने पुन्हा अखेर चा निरोप घेतला व तिच्यावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. ही घटना शुक्रवारी ३१ ऑक्टोबर रोजी घडली असून या घटनेची चर्चा तालुक्यात आहे.
तालुक्यातील डांभुर्णी येथील रहिवासी यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालीका सौ.कांचन ताराचंद फालक यांच्या सासु मंजुळा मिठाराम फालक ( वय ९२ वर्ष ) शुक्रवारी सकाळी नित्याप्रमाणे झोपेतून उठल्यानंतर सकाळी ११ वाजेला त्यांनी जेवण केलं. त्यानंतर बारा वाजेला त्यांचे निधन झाल झाले असल्याचा निरोप नातेवाईकांना देण्यात आला. त्यानुसार सर्व नातेवाईकांनी अंत्यसंस्कारा करीता डांभुर्णी येथे पोहोचले.
दरम्यान अंत्यविधीची तयारी करण्यात आली. वृद्धेला अखेरची आंघोळ घालण्यात आली. यावेळेस त्या मयत महिलेने अचानक सुनेचा हात पकडला व डोळे उघडले. यामुळे सर्वांना आनंदाचा धक्का बसला. यानंतर मात्र या वृद्धेने सुमारे अर्ध्या तासाने डोळे मिटविले ते कायमचे ! त्यानंतर डॉक्टरांनी तपासणी केली असता तिला मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. वयोवृद्ध महिला मारून जिवंत झाल्याचा आनंद फार काळ टिकला नाही. मात्र मृत झाल्या नंतर महिला पुन्हा जिवंत झाल्याची चर्चा पंचक्रोशीसह तालुक्यात होत आहे.



