चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातील मुख्य राष्ट्रीय महामार्ग वरील वाढलेल्या झाड-झुडपांमुळे रहदारीला होणाऱ्या अडथळ्यामुळे नागरिक त्रस्त झाले होत. यासंदर्भात नागरिकांनी आ. मंगेश चव्हाण यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने महाराणा प्रताप चौक (कॉलेज पॉईंट) ते धुळे रोड बायपास (हॉटेल विराम) पर्यंतच्या निरुपयोगी व रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या झाड – झुडप जेसीबीच्या साहाय्याने काढण्यास सुरुवात करण्यात आली.
शहराच्या मुख्य भागातून राष्ट्रीय महामार्ग क्र.२११ जाते असून यातील महाराणा प्रताप चौक (कॉलेज पॉईंट) ते धुळे रोड बायपास (हॉटेल विराम) पर्यंतच्या रस्त्याच्या आजूबाजूला झाड – झुडपे वाढल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होत होते. या भागात वाहनांची वर्दळ देखील जास्त असल्याने याचा त्रास प्रवाश्यांना होत होता. यानुषंगाने धुळे रोड येथील रहिवासी प्रा.आर. पी.चोपडा, मनोज सोनवणे व के बी. पाटील यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्या जनसेवा कार्यालयात तक्रार केली असता आमदार चव्हाण यांनी तात्काळ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व नगरपालिकेला सदर रस्त्यालगत असलेली निरुपयोगी झाडे -झुडुपे तात्काळ काढण्यात यावी अश्या लेखी सूचना दिल्या होत्या.
आमदार चव्हाण यांच्या सूचनांची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने महाराणा प्रताप चौक (कॉलेज पॉईंट) ते धुळे रोड बायपास (हॉटेल विराम) पर्यंतच्या निरुपयोगी व रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या झाड – झुडप जेसीबीच्या साहाय्याने काढण्यास सुरुवात करण्यात आली. यामुळे या रस्त्याने मोकळा श्वास घेतला असून नागरिकांच्या समस्यांची तात्काळ दखल, त्याचा सुयोग्य पाठपुरावा आमदार मंगेश चव्हाण यांच्या जनसेवा कार्यालयामार्फत घेतला जात असल्याने तक्रारदार यांनी समाधान व्यक्त केले.