यावल येथे एक देश, एक राशन कार्ड योजनेंतर्गत पोर्टेबिलिटी

यावल प्रतिनिधी । “One Nation – One Ration Card” ही योजना केन्द्र शासनाने आणली असुन या “एक देश, एकच रेशन कार्ड” योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेमुळे देशात राहणाऱ्या नागरीकाला कोणत्याही राज्यात सहज धान्य मिळवता येईल, या योजनेंतर्गत आंतरराज्य आणि राज्यांतर्गत पोर्टेबिलिटी बाबत युद्धपातळीवर जनजागृती करणे आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी करणेसाठी प्रशासनाने सूचना दिल्या आहेत. यासाठी 12 सप्टेंबर रोजी “राष्ट्रीय अन्न सुरक्षा दिवस” साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती यावलचे तहसीलदार जितेन्द्र कुवर यांनी दिली आहे.

पोर्टेबिलिटीद्वारे लाभार्थ्यांस देशात कोणत्याही स्वस्त धान्य दुकानात त्याचे हक्काचे धान्य घेणे शक्य होणार आहे. यासाठी लाभार्थ्यांने आपला आधार क्रमांक रेशनकार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांनी स्वस्त धान्य दुकानात जाऊन ई-पॅास मशिनच्या सहाय्याने आधारचे बायोमेट्रीक प्रमाणीकरण करून घेतल्यास धान्य घेणे शक्य होणार आहे. पोर्टेबिलिटीबाबत शासनाकडून प्राप्त पोस्टर्सच्या नमुन्याद्वारे तहसिल कार्यालये आणि शासकीय कार्यालये, बँका, पोस्ट ऑफीस, मार्केट कमिटी, बाजारपेठा इ. ठिकाणी पोस्टर्स लावून जनजागृती करणेत येणार आहे.

आज यावल तहसिल कार्यालयात तहसीलदार जितेंद्र कुवर यांचे हस्ते पोर्टेबिलिटी पोस्टर्सचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी निलेश पाटील , आर.डी. पाटील, (नायब तहसिलदार यावल,) तालुका पुरवठा निरीक्षक अंकिता वाघमळे , सकावत तडवी, ( पुरवठा हिशोब अव्वल कारकुन यावल,) अशोक नेवे स्वस्त धान्य दुकानदार साकळी, आदीवासी अतिदुर्गम क्षेत्रातील उसमळी गावातील स्वस्त धान्य दुकानदार सी. जे. बारेला उपस्थित होते.

Protected Content