Home Uncategorized भारत गॅस गोदामातून ५७ सिलिंडरची चोरी; ७२ हजारांचा मुद्देमाल लंपास

भारत गॅस गोदामातून ५७ सिलिंडरची चोरी; ७२ हजारांचा मुद्देमाल लंपास

0
145

वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील बोहर्डी शिवारातील लालमाती येथील भारत गॅस कंपनीच्या गोदामातून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ५७ भरलेल्या गॅस टाक्या चोरून नेल्याची घटना २५ फेब्रुवारी रोजी समोर आली आहे. याबाबत गुरूवारी २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी नरेन्द्र उत्तमराव अहिरे (वय ५१, रा. शांतीनगर, भुसावळ) हे भारत गॅसचे संचालक आहेत. त्यांचे बोहर्डी शिवारात गॅस साठवणुकीसाठी गोडाऊन आहे. गुरूवार २५ फेब्रुवारीच्या सायंकाळी ५:३० ते २६ फेब्रुवारीच्या सकाळी ८:२० वाजेच्या दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी या गोदामाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी गोदामात ठेवलेल्या प्रत्येकी १,२७८ रुपये किमतीच्या एकूण ५७ भरलेल्या गॅस टाक्या, ज्याची एकूण किंमत ७२ हजार ८४६ रुपये आहे, त्या वाहनात भरून चोरून नेले आहे. याबबात वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ यासीन पिंजारी हे करीत आहे.


Protected Content

Play sound