Home Cities जळगाव रंगभूमीच्या विकासासाठी सदैव मदत करणार – आ. राजू मामा भोळे

रंगभूमीच्या विकासासाठी सदैव मदत करणार – आ. राजू मामा भोळे


जळगावलाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी जळगावची रंगभूमी ही सशक्त असून जळगावचे नाटक कला वाढीसाठी जी ही मदत लागेल ती मदत सदैव करणार व संभाजीराजे नाट्यगृहाच्या अडचणी दूर करण्यासाठी सुद्धा काम करणार असल्याचे मत आ. राजू मामा भोळे यांनी रंगभूमी दिनानिमित्त व्यक्त केले.

संभाजी राजे नाट्यगृहात रंगभूमी दिनानिमित्त रंगमंचाच्या पूजनाचा कार्यक्रम कलावंतांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला होता. याप्रसंगी राजू मामा भोळे यांनी मनोगत व्यक्त करताना विचार मांडले. याप्रसंगी गायक दुष्यंत जोशी यांनी नांदी सादर केली. नाट्य, संगीत, चित्रकला व साहित्य क्षेत्रातील कलावंत याप्रसंगी उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत रंगभूमीचे पूजन करून कलावंतांच्या कार्याला शुभेच्छा देण्यात आल्या.

याप्रसंगी ज्येष्ठ रंगकर्मी चिंतामण पाटील, शंभू पाटील, पुरुषोत्तम चौधरी, विजय पाठक, मंजुषा भिडे, होरीलसिंग राजपूत, पियुष रावळ, नारायण बाविस्कर, विनोद पाटील, योगेश शुक्ल, अनिल मोरे, संजय निकुंभ अंजली पाटील जयश्री पाटील, राजू बाविस्कर, हेमंत भिडे, बी. के. पाटील, मंगेश कुलकर्णी, नेहा पवार, करतारसिंग चव्हाण, श्री सुरपूर, सागर येवले, तेजस पाठक आदी याप्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता हर्षल पाटील यांनी केले.


Protected Content

Play sound