Home टेक्नोलॉजी एआयमुळे नोकऱ्या जाणार? घाबरू नका; ‘या’ क्षेत्रांमध्ये पुढील अनेक दशके मानवी हातांनाच...

एआयमुळे नोकऱ्या जाणार? घाबरू नका; ‘या’ क्षेत्रांमध्ये पुढील अनेक दशके मानवी हातांनाच राहणार मागणी!


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जगभरात आर्टिफिशियल इंटिलिजन्स अर्थात AI चा वापर झपाट्याने वाढत आहे. ऑफिसपासून उद्योगधंद्यांपर्यंत अनेक ठिकाणी AI मुळे कामांची पद्धत बदलत असून काही नोकऱ्यांवरही त्याचा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे अनेकांच्या मनात “AI मुळे आपली नोकरी धोक्यात येईल का?” असा प्रश्न निर्माण होत आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते, AI अनेक कामे जलद आणि सोपी करू शकते, पण प्रत्येक क्षेत्रात माणसाची जागा घेणे शक्य नाही. विशेषतः ज्या कामांमध्ये मानवी भावना, अनुभव, विश्वास, नेतृत्व आणि त्वरित निर्णय घेण्याची क्षमता आवश्यक असते, त्या क्षेत्रांमध्ये माणसाची गरज कायम राहणार आहे.

 


Protected Content

Play sound