वळणावर दुचाकी घसरल्याने पत्नी ठार, पती जखमी

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे गावाजवळील जामदा फाट्यासमोरील वळणावर दुचाकी घसरल्याने झालेल्या अपघातात पत्नी ठार झाल्या असून पती गंभीर जखमी झाल्याची घटना ११ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० वाजता घडली होती. या घटनेप्रकरणी अखेर चौकशीअंती गुरुवार २१ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, भारत वाळूवा खैरनार रा. दरेगाव ता. चांदवड जि. छ. संभाजी नगर हे आपल्या परिवारासह वास्तव्यावर असून ११ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० वाजता भारत खैरनार हे त्यांची दुचाकी (एमएच १५ सीजी २४२९) ने त्यांची पत्नी सखुबाई भारत खैरनार वय-४० यांच्यासोबत चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे जवळील जामदा फाट्यासमोरून जात होते. त्यावेळी पुढे वळणावर त्यांची दुचाकी घसरली, या अपघातात सखुबाई भारत खैरनार यांचा जागीच मृत्यू झाला तर भारत खैरनार हे गंभीरित्या जखमी झाले. जखमी झालेल्या भारत खैरनार यांना तातडीने चाळीसगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या अपघातप्रकरणी चौकशी अंती अखेर गुरुवार २१ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता मेहुणबारे पोलीस ठाण्यात दुचाकी चालक भरत खैरनार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रमेश धरवजे करीत आहे.

Protected Content