भडगाव येथे नविन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हयातील भडगाव येथे नविन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु करण्यास मान्यता देण्यात आलेली असून. नविन कार्यालयाचे कार्यक्षेत्र हे भडगाव, पाचोरा, पारोळा व अमळनेर तालुक्यात राहणार असून आरटीओ कोड MH-54 असा असणार आहे. कार्यालय कार्यान्वीत झाल्यानंतर पहिल्या टप्या, 21 मार्च पासून सर्व नविन वाहनांची नोंदणी भडगाव येथील नविन कार्यालयाव्दारे करण्यात येणार आहे.

येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात परिवहनेतर संवर्गातील हलके / अवजड मालवाहू वाहनांसाठी नवीन नोंदणी MH54.0001 ते 9999, दुचाकी वाहनांसाठी नवीन नोंदणी MH54.0001 ते 9999, हलके मोटार वाहन (परिवहनेतर) खाजगी कार / ट्रॅक्टर-टगेलर/कस्ट्रक्शंन इक्युपमेंट व्हेईकल) वाहनांसाठी नवीन नोंदणी MH54 B 0001 ते 9999 व तीनचाकी परिवहन वाहनांसाठी नवीन नोंदणी MH54C.0001 ते 9999 पर्यंतची मालिका 22 मार्च, 2024 पासून सुरु करण्यात येत आहे. ज्या वाहनधारकांना आपल्या वाहनांसाठी आकर्षक व पसंतीचा नोंदणी क्रमांक हवा असेल त्यांनी शासकीय शुल्काचा Dy RTO Bhadgaon यांच्या नावे असलेला धनादेश, ओळखपत्र जमा करावे. त्यानंतर आपल्या पसंतीचा क्रमांक प्राप्त करुन घ्यावा. असे आवाहन श्याम लोहि , उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.

तसेच नविन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय हे गट नं. 84/2/ब/1/ब, मौजे टोणगाव, भडगाव-पाचोरा रोड, आिार्वाद जिनिंग समोर, भडगाव – 424105 ता. भडगाव येथे असून भडगाव, पाचोरा, पारोळी व अमळनेर तालुक्यातील नागरिकांनी त्यांचे आरटीओ संबधित कामकाज हे भडगाव येथेच करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोहि यांनी केले आहे.

Protected Content