नागपूर, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | नागपुर मधील हनुमान मंदिरात हनुमान चालीसा पठण करणार असल्याचे राणा दाम्पत्याने जाहीर केले होते. त्यानुसार हे आज नागपुरात दाखल झाले असून त्यांना नागपूर विमानतळावरच गेल्या अडवण्यात आल्याचा दावा करीत महाराष्ट्रात देवाचा एवढा विरोध का? असा प्रश्न खा. नवनीत राणा यांनी केला आहे.
गेल्या महिन्यात मातोश्री समोर हनुमान चालीसा पठण करणार या इशाऱ्यावरून खा. नवनीत राणा आणि आ.रवि राणा यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची अटी शर्तीसह जामिनावर सुटका झाली होती. त्यानंतर दिल्ली आणि लडाख सीमेवर दौरा करून ते नागपूरमध्ये दाखल झाले असून नागपूरमध्ये जाहीर केल्यानुसार राणा दाम्पत्य मंदिरात हनुमान चालीसा पठण करणार होते. पण त्यापूर्वीच त्यांना विमानतळावरच थांबवून ठेवण्यात आले होते.
या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांनी उद्धव ठाकरेंना दुसरे काहीच काम नाही का? राज्यावर आलेले संकट दूर होण्यासाठी दररोज हनुमान चालीसा आणि आरती करेन असे म्हणत राज्य सरकारवर आणि विशेषत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. तसेच आम्ही जिथे पोचतो, तिथे सरकार त्यांची पूर्ण ताकद लावते. हनुमानाचे नाव घेणाऱ्यांना जेलमध्ये टाकले जाते. परवानगी नाकारणे, ताब्यात घेणे, असे प्रकार ही सगळी नेहमीची प्रक्रिया आहे. हा सगळा प्रकार जनता पाहात असून अहंकार मोडून काढण्याचं काम राज्यातील हनुमान भक्त करतील असेही आ. रवि राणा यांनी म्हटले आहे.