सरकार पुरावे का सादर करत नाही? ; शहीद जवानाच्या पत्नीचा सवाल

68282300

उत्तर प्रदेश (वृत्तसंस्था) माझ्या पतीचे शव मी स्वत:च्या डोळ्यांनी पाहिले आहे. जर खरोखरच भारताने जैशच्या कॅम्पवर एअरस्ट्राइक केले असेल तर त्याचे पुरावे सरकार का सादर करत नाही? असा प्रश्न पुलवामात शहीद झालेले जवान राम वकील यांच्या पत्नी गीता देवी यांनी सरकारला विचारला आहे. दरम्यान,गीता देवींच्या आधी शामलीच्या प्रदीप कुमार यांच्या पत्नी सर्मिष्ठा देवी यांनीही एअरस्ट्राइकचे पुरावे मागितले होते. आता सरकार या घटनेचे पुरावे कधी देते ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

१४ फेब्रुवारीला काश्मीरमधील पुलवामाजवळ सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात ४० जवान मृत्यूमुखी पडले. या हल्ल्यानंतर १२ दिवसांनी २६ फेब्रुवारीला पाकिस्तानातील जैशच्या दहशतवाद्यांच्या तळावर भारतीय हवाई दलाने बॉम्बवर्षाव केला. या बॉम्बवर्षावात जवळपास ३५० दहशतवाद्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त दिले आहे. ‘ जर इतक्या मोठ्या संख्येने लोक खरोखर मेले असतील तर त्याचे पुरावे काय? कोणाला दिसले तरी असतील. या एअरस्ट्राइकचे लवकरात लवकर पुरावे देण्यात यावेत. अन्यथा आम्ही कारवाईवर विश्वास कसा ठेवावा? असा सवालच गीता देवी यांनी विचारला आहे. मणिपुरीच्या राम वकिल यांना तीन मुलं आहेत. या तिघांचीही जबाबदारी आता गीता देवींवर पडली आहे. काश्मीरहून परत आल्यावर राम वकील त्यांच्या घराचे बांधकाम सुरू करणार होते.

Add Comment

Protected Content