नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अवघ्या देशाला हादरा देणार्या श्रध्दा या तरूणीच्या खून प्रकरणातील सैतान आफताब पुनावाला याने तिचा मृतदेह फ्रिजमध्ये असतांनाच दुसर्या मुलीसोबत त्याच घरात संबंध ठेवल्याचे चौकशीत आढळले आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, आफताब अमीन पुनावाला नावाच्या तरुणाने श्रद्धाला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. दोघेही कॉल सेंटरमध्ये काम करत होते. तिने जेव्हा लग्न करण्यासाठी त्याच्यावर दबाव आणला. तेव्हा त्याने तिचा खून केला. तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करुन दिल्ली परिसरात फेकून दिले. घटनेच्या सहा महिन्यानंतर हा प्रकार काल उघडकीस आलेला आहे. त्याने श्रध्दाच्या मृतदेहाचे तुकडे करून ते रात्री फेकून दिल्याचे चौकशीत समोर आले आहे.
दरम्यान, पोलिसांनी केलेल्या चौकशीतून पुन्हा एक भयंकर बाब समोर आली आहे. श्रध्दाचा मृतदेह फ्रिजमध्ये असतांनाच त्याने पुन्हा एकदा एका तरूणीशी संबंध ठेवले होते. ज्या डेटिंग ऍपवरुन श्रद्धा आणि अफताबची ओळख झाली. त्याच डेटिंग ऍपवरुन त्याची अन्य एका मुलीसोबत ओळख झाली होती. ती दुसरी मुलगी सायकोलॉजिस्ट होती. डेटिंग ऍपच्या माध्यमातून ते संपर्कात आले व त्यांनी डेट करायला सुरुवात केली. त्यानंतर श्रद्धाच्या खूनानंतर तो त्या मुलीला तो राहत असलेल्या फ्लॅटवर घेऊन आला, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.