मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | आमच्या दोन नेत्यांची काही चुकी नसताना केवळ केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापरामुळे काहीही चुकीच न करता तुरुंगात आहेत. आमच्या दोन्ही नेत्यांवर हा अन्याय असून न्यायालयावर विश्वास असल्याचेही खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या.
ईडीकडून राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईवर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे य़ांनी टीका केली असून देशमुख यांच्या घरी १०९ वेळा छापे टाकण्यात आले. एकाच व्यक्तीच्या घरी इतक्या वेळा छापे टाकण्याचा हा विश्वविक्रमच होईल, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री मलिक यांना राज्यसभेच्या मतदानाची संधी मिळण्यासाठी मंत्री व राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ प्रयत्न करीत असल्याचेही सुळे म्हणाल्या, नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी नुकतेच राज्यसभा निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी ईडीकडे अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर ८ जूनला सुनावणी होणार असल्याचे म्हटले आहे.