दुचाकीच्या धडकेत वेल्डिंग कामगार गंभीर जखमी

अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील फर्निचर दुकानासमोर पायी जाणाऱ्या एका वेल्डींग काम करणाऱ्या प्रौढाला मागून दुचाकीने जोरदार धडक दिल्याने गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शनिवारी २४ मे रोजी दुपारी साडेतीन वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात दुचाकीवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शरद हिम्मत पाटील वय ४७ रा. मंगरूळ ता.अमळनेर हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. ते एका वेल्डींग दुकानावर कामावर आहे. १८ मे रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास कामावरून पायी मंगरूळ गावात घरी जात असतांना रस्त्यावरील महाराजा फर्निचर दुकानासमोर मागून त्यांना एका भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिली. या अपघातात शरद पाटील हे गंभीर जखमी झाले. गावातील गावकऱ्यांनी तातडीने धाव घेवून त्यांना अमळनेरातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर शरद पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुचाकीवरील अज्ञात चालकाविरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ कैलास शिंदे करीत आहे.

Protected Content