मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे नविन समीकरण जुळू पाहत आहे. या नव्या समीकरणावर महाराष्ट्राच्या राजकारणात नवी मोट बांधली जाणार असेल तर स्वागत करेल,” असे मत राष्ट्रवादीचे नेते खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भाष्य केले आहे.
स्पष्ट बहुमत मिळण्याचा दावा भाजपाकडून केला जात असताना त्यांचा विजयी रथ १०७ जागांवरच थांबला. त्यामुळे भाजपाला शिवसेनेशिवाय पर्याय नसल्याची चर्चा सुरू झाली. भाजपा शिवसेना सत्तेत बसणार असं चित्र तयार होत असतानाच काँग्रेस-राष्ट्रवादीनं भाजपाला सत्तेपासून रोखणं आपला प्राधान्यक्रम असल्याचे सांगत महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण केला. त्याचबरोबर नव्या आघाडीची मोट बांधण्याचे संकेतही दिले आहेत. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी शिवसेनेला मुख्यमंत्री पद हवं असल्यास त्यांनी राष्ट्रवादीसोबत यावे, असं सांगितल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.