मुक्ताईनगरात पालकमंत्री आणि आमदार यांच्या निर्णयाचे स्वागत

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यात संघटनेची जोरदार बांधणी केली असून संघटनेला बळ दिलं आहे. जिल्ह्यात पाच आमदार निवडून येण्याचं श्रेय त्यांना जात असून पालकमंत्री आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी घेतलेल्या निर्णयाचं आम्ही स्वागत करत असून त्यांना आमचा पाठींबा असल्याचे मुक्ताईनगर येथील शिवसेना कार्यकर्त्यांनी सांगितले.

सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर शहरातील कार्यकर्ते व्यक्त झाले. आघाडीच्या सरकारमध्ये काही विरोधक आहेत त्यांनी आमच्यावर, शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुखांवर गुन्हा दाखल केला. सरपंचांवर गुन्हा दाखल झाला. ही केवळ आजची परिस्थिती नाही तर नेहमी आमच्यावर सतत अन्याय अत्याचार होत आहे. आम्ही खूप वेळा मातोश्री मुख्यमंत्री यांच्याकडे दाद मागितली. वरिष्ठ नेत्यांकडे दाद मागितली मात्र  उत्तर आले नाही किंवा आम्हाला न्याय मिळाला नाही.

महाविकास आघाडीचे सरकार असून तालुक्याचे त्याचे काम होत नसतील. आमदार लोकांचे काम होत नसेल तर पेच निर्माण होणार आहे. आमदार चंद्रकांत पाटलांनी खेड्यापाड्यात जाऊन शाखेसाठी काम केले असल्याचे सांगत ते आमच्यासाठी सर्वस्व असून ते जे निर्णय घेतील त्या निर्णयाला आमचा पाठिंबा असेल असे मुक्ताईनगर शिवसेना तालकाप्रमुख छोटू भोई यांनी सांगितले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

%d bloggers like this: