जळगाव प्रतिनिधी | ‘राष्ट्रीय मतदार दिना’निमित्त शहरातील ॲड.एस.ए.बाहेती महाविद्यालयात ‘लोकशाहीत मतदानाचं महत्त्व’ या विषयावर ऑनलाइन वेबिनार संपन्न झालं.
मंगळवार, दि.२५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता ‘राष्ट्रीय मतदार दिना’निमित्त ॲड.एस.ए.बाहेती महाविद्यालयात ऑनलाइन वेबिनार आयोजित करण्यात आले होतं.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्राचार्य डॉ.अनिल लोहार यांनी, “विवेक बुद्धी जागृत ठेवून मतदारांनी मतदान करायला हवं. सर्वांगसुंदर असलेल्या आपल्या लोकशाहीला बळकट करण्यासाठी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करायला हवं.” असं आवाहन केलं.
शहादा महाविद्यालयाचे प्रा.अनिल साळुंखे यांनी, “युवकांचा राजकीय सहभाग वाढवणं हा ‘राष्ट्रीय मतदान दिना’चा महत्त्वाचा उद्देश असून वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या युवकांनी मतदार यादीत आपले नाव नोंदवावं असं आवाहन केलं’ मतदार कार्ड आता आधार कार्ड लिंक होणार असल्याचं सांगत तुझ्या पुढे कोणी मतदान केलं किंवा नाही याची नोंद होणार असल्याची माहिती सांगत ‘लोकशाहीत मतदानाचं महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन केलं.
कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.गौतम भालेराव यांनी केलं.