Home क्राईम भरधाव डंपरने सेवानिवृत्त शिक्षकाला उडविले !

भरधाव डंपरने सेवानिवृत्त शिक्षकाला उडविले !

0
106

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । सकाळी चहासाठी दूध खरेदी करून पायी घरी परतणारे निवृत्त शिक्षक पुंडलिक भिका पाटील (७५, रा.शिवराणा नगर) यांना भरधाव डंपरने धडक दिल्याने ते जागीच ठार झाले. हा अपघात मंगळवार, १३ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात वाजता गुजराल पेट्रोल पंप चौकामध्ये झाला. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पहूर येथील शाळेतून निवृत्त झालेले पुंडलिक पाटील हे शिवराणा नगरात पत्नीसह राहत होते. मंगळवार, १३ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात वाजता ते गुजराल पेट्रोलपंप चौकातून दूध खरेदी करून रस्ता ओलांडत असताना जळगावकडून पाळधीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने त्यांना जोरदार धडक दिली. अ

पघातानंतर तेथे असलेल्या रिक्षा चालकांनी त्यांच्या घरी अपघाताची माहिती दिली. त्या वेळी घराजवळच राहणारे पाटील यांचे भाचे डॉ. सुनील पाटील व अन्य मंडळींनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालायात दाखल केले. तेथे त्यांना डॉक्टरांनी मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी आक्रोश केला. अपघाताची माहिती मिळताच रामानंदनगर पोलिस घटनास्थळी पोहचले.


Protected Content

Play sound