भुसावळच्या विद्यार्थ्यांनी बनवली ‘वेदर मॉनिटरिंग सिस्टिम’

35bbd124 f395 4032 a472 802df84a9131

भुसावळ प्रतिनिधी | ‘टेलिकॉम कनेक्टिव्हिटी’च्या माध्यमातून इंटरनेटचे जाळे अजून दाट विणले जाऊन फक्त संगणक, मोबाईल नव्हे तर आपल्या सभोवताली असलेल्या सगळया वस्तू एकमेकांना जोडल्या गेल्या आहेत. या नेटवर्कला ‘इंटरनेट ऑफ थिंग’ किंवा ‘आयओटी’ म्हटले जाते. याच प्रणालीचा वापर करत येथील हिंदी सेवा मंडळ संचलित श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकीच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉम विभागाच्या अंतिम वर्षाच्या दोन विद्यार्थ्यांनी ‘वेदर मोनिटरिंग सिस्टिम’ साकारली आहे.

 

विद्यार्थी शहावर शेख, कासिफ हमीद सय्यद यांनी प्रा.धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेल्या या यंत्रणेमुळे हवामानाच्या चुकीच्या अंदाजांमुळे कृषी पिकांचे व इतर कृषी कामांमध्ये शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळता येणे शक्य होणार आहे. या यंत्रणेमुळे शेतकरी घरबसल्या शेतातील पर्जन्यमान व इतर महत्वाच्या बाबींवर लक्ष ठेवू शकतो. तसेच या प्रणालीमुळे डेटा मॉनिटरिंग, डेटा पाठवणे आणि नियंत्रित करणे यासारखे प्रयोग घरबसल्या करू शकणे शक्य झाले आहे.

सदर प्रणालीचा उपयोग आपल्या सभोवताली उपलब्ध संगणक, मोबाईल, सीसीटीव्ही, कार, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एसी, ओव्हन, किचन उपकरणे, पाण्याचा पंप, टीव्ही, डुअर-बेल, म्युझिक सिस्टम, लाईट, पंखे तसेच कार्यालयातील सर्व विजेची उपकरणे एकमेकांशी जोडुन आपण वेगवेगळ्या सेन्सर, सॉफ्टवेअर आणि इलेक्ट्रॉनिक सर्किटच्या माध्यमातून होम ऑटोमॅशन करू शकतो. घरच्या बाहेरून कोठूनही ही उपकरणे सुरू किंवा बंद केली जाऊ शकतात.

प्रकल्पाचे वैशिष्ट्ये :- शेती व्यवसायात हवामानाची देखरेख महत्त्वपूर्ण आहे. हवामानाचे निरीक्षण करण्यासाठी बरेच उपाय आहेत. वायरलेस सेन्सर नेटवर्क (डब्ल्यूएसएन) वर आधारित तापमान, आर्द्रता, दाब आणि वाऱ्याची दिशा आणि पावसाचे प्रमाण मोजण्यासाठी सेन्सर वापरलेले आहेत. कृषी उत्पादनांची वाहतूक किंवा वितरण करण्यासाठी कृषी उत्पादनांची लागवड, क्रॉपिंग नमुने, रोपे, कापणी व इतर प्रक्रिया करण्याच्या वेळेची माहिती यातून मिळू शकते. तसेच हवामानातील माहितीमधून शेतक-यांना बिजारोपण करण्याची वेळ निश्चित करण्यात मदत होणार आहे. तसेच पिकांच्या लागवडीसाठी आवश्यक असलेल्या पाण्याच्या प्रजातींची नमुना निश्चित करता येईल.

तांत्रिक माहिती :- एटमेगा ३२८ पी वर आधारित मायक्रो कंट्रोलर बोर्ड यात वापरलेला आहे. डीएचटी ११ हे अल्ट्रा लो-कॉस्ट डिजिटल तापमान आणि आर्द्रता सेन्सर आहे. हे आसपासच्या हवेचे मोजमाप करतात आणि डेटा पिनवर डिजिटल सिग्नल टाकतात, त्याचा वापर करणे अगदी सोपे आहे. प्रत्येक दोन सेकंदातच आपणास केवळ नवीन डेटा मिळवता येतो. एम्बेडेड डिव्हाइसेस, आरएफ वायरलेस टेक्नॉलॉजी संकल्पना वापरली आहे.पुढील काही वर्षात जगातील विविध क्षेत्रातील करोडो उपकरणे टेलिकॉम तंत्रज्ञानाच्या मदतीने हायस्पीड इंटरनेटच्या माध्यमातून जोडली जाऊन ही उपकरण एक दुसऱ्याशी संवाद साधून एक मोठी क्रांती घडणार आहेत.

या प्रणालीमुळे विद्यार्थी असे प्रकल्प बनवून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम क्षेत्रात अधिक स्वयंरोजगार निर्माण करतील, अशी माहिती प्रकल्प मार्गदर्शक प्रा.धीरज पाटील यांनी यावेळी दिली.सध्याचे डिजिटल युग, रोबोटिक-प्रोसेस ऑटोमेशन व पुढची पायरी म्हणजे टेलिकॉम नियंत्रित उपकरणे सामान्य विद्यार्थी त्यांच्या तांत्रिक कौशल्याने हाताळत आहेत, कृषी क्षेत्रासोबत विद्यार्थी सामाजिक व आर्थिक परिवर्तनासाठी उपयोगी ठरणारे प्रकल्प सादर करीत आहे, याचा आनंद वाटतो असे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम विभागाचे प्रमुख डॉ. गिरीश कुळकर्णी यांनी सांगितले.हिंदी सेवा मंडळाचे अध्यक्ष जे.टी. अग्रवाल, सचिव मधूलता शर्मा, अॅड. महेशदत्त तिवारी, सत्यनारायण गोडयाले तसेच प्राचार्य डॉ.आर.पी. सिंह, डीन डॉ. राहुल बारजिभे यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Add Comment

Protected Content